‘तौक्ते’ चक्रीवादळाचा सातारा जिल्ह्यातील फळबागांना मोठा तडाखा 

माण तालुक्यातील डाळिंब फळबागांना ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून बहार धरलेल्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.

निधन वार्ता

सनातनचे साधक श्री. राजू संभाजी बोंबले यांचे भाऊ विजय संभाजी बोंबले (४० वर्षे) यांचे १७ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.

मुंबईत लोकल रेल्वेने अधिवक्त्यांना प्रवासाची अनुमती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

लोकलमध्ये गर्दी झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने राज्यशासनाने निर्बंध ठेवले आहेत, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने लोकल रेल्वेगाड्यांमधून अधिवक्त्यांना प्रवास करण्याची अनुमती नाकारली आहे.

‘दक्षिण मुंबई कॅटरिंग  असोशिएशन’कडून ‘२ घास पोटासाठी’ उपक्रमाद्वारे अन्नवाटप !

कोरोनाच्या कालावधीत हातावर पोट असणारे नागरिक उपाशी राहू नयेत, यासाठी ‘दक्षिण मुंबई कॅटरिंग असोशिएशन’ या संस्थेच्या वतीने काळाचौकी आणि शिवडी येथील कामगार विभागात ‘दोन घास पोटासाठी’ हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.

रुग्णाच्या मृत्यूनंतर आधुनिक वैद्यास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद !

कोरोनाबाधितावर उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी आधुनिक वैद्य आणि रुग्णालयातील कर्मचारी यांना मारहाण केली. या प्रकरणी २ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बलात्काराचा सूड घेण्यासाठी पीडित विवाहितेने पतीसमवेत मिळून केली बलात्कार्‍याची हत्या !

हबीबुल्लाह नावाच्या युवकाने एका विवाहितेवर बलात्कार केला. याचा सूड घेण्यासाठी या विवाहितेने तिच्या पतीच्या साहाय्याने हबीबुल्लाह याची हत्या केली. पोलिसांनी या दांपत्याला अटक केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमधून किराणा साहित्याची विक्री २३ मेपासून बंद ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली 

जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १९ ते २६ मे या कालावधीत  प्रतिबंधात्मक आदेशांची कार्यवाही करण्यात येत आहे यामुळे आता २३ मेपासून कृषी उत्पन बाजार समितीमधून किराणा साहित्याची विक्री २३ मेपासून बंद राहिल.

पैठण येथे बनावट आधुनिक वैद्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाचे आक्रमण !

कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाने शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, तसेच इंजेक्शनचा साठा आणि शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे घेऊन ते निघून गेले. यासमवेत त्यांनी आरोपी बिस्वास याला पसार होण्यास साहाय्य केले.

सोलापूर महापालिकेच्या १५ आरोग्य केंद्रांमध्ये चालू करणार ‘औषध बँक’ !

रुग्णांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सोलापूर महापालिकेने स्तुत्य निर्णय घेतला असून अन्य महापालिकांनीही अशाच प्रकारचा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घ्यावा !

किशोर घाटगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आशा वर्कर, कर्मचारी यांना ‘ऑक्सिमीटर’, ‘हॅन्डग्लोज’, तसेच अन्य साहित्य प्रदान !

किशोर घाटगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंचगंगा लसीकरण केंद्र येथील आशा वर्कर, कर्मचारी यांना ‘ऑक्सिमीटर’, ‘हॅन्डग्लोज’ आणि ‘मास्क’ प्रदान करण्यात आले.