अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी युवकाला पोलीस कोठडी
तालुक्यातील एका गावात शाळेत जाणार्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी ऋतिक कमलाकर कदम याला न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली.
तालुक्यातील एका गावात शाळेत जाणार्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी ऋतिक कमलाकर कदम याला न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली.
यापुढील काळात दुचाकी वाहनांना आरसा नसल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. कागदपत्रे, विमा पॉलिसीसह वाहनांना आरसे बंधनकारक आहेत. सध्या वाहनांच्या संख्येत विक्रमी संख्येने वाढ होत आहे.
तालुक्यातील सांगवे सोसायटीच्या रास्त भाव धान्य दुकानाची अनुज्ञप्ती जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी रहित केली आहे. याविषयी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे मुक्ताई मंदिरासमोर १३ डिसेंबरला रात्री साडे ९ वाजता एकमेकांवर अंडी मारून वाढदिवस साजरा करणार्या ६ धर्मांधांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
जिल्ह्यातील सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत १६ डिसेंबर या दिवशी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित केली होती. ही आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे.
येथील वनविभाग स्थानिक जंगल परिसरात मिळणार्या फळांवर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प राबवत आहे. याचे दायित्व येथील महिला बचतगटाकंडे देण्यात येणार आहे. यासाठी लागणारी यंत्रसामुग्री, ‘पॅकिंग’ आणि मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे दायित्व वनविभागाचे असणार आहे.
सनातन संस्थेच्या साधिका रंजना नामदेव शिंदे (वय ४८ वर्षे) यांचे १५ डिसेंबर या दिवशी कर्करोगाच्या व्याधीमुळे निधन झाले.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून अवैध व्यवसाय का बंद करत नाही ?
पाळी-कोठंबी येथे तिशे धक्क्यावर खनिज मालाने भरलेले जहाज १५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी मांडवी खाडीत बुडाले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जहाजावर असलेल्या १० खलाशांनी पोहून तट गाठल्याने ते सुरक्षित राहिले.
जिल्हा पंचायत निवडणुकीमुळा लागू करण्यात आलेली आचारसंहिता निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर या दिवशी मागे घेतली आहे.