अधिवक्त्यांना धर्मशिक्षण मिळाले पाहिजे !

‘उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करतांना अधिवक्ते एकमेकांवर ओरडतात. असे वागणे, म्हणजे न्यायमूर्तींचा अवमान केल्यासारखेच आहे’, अशी टिपणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर्. गवई यांनी केल्याचे वाचनात आले. न्यायालयातील अधिवक्त्यांविषयी न्यायमूर्ती गवई यांनी केलेले वक्तव्य खरे तर समाजातील प्रत्येकाने गांभीर्याने घेतले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाची होणारी मानहानी म्हणून याकडे पहाता अधिवक्त्यांनी स्वतःचे वर्तन सुधारले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयासारख्या न्याय मंदिरामध्ये अशा पद्धतीचे वर्तन करणार्‍या अधिवक्त्यांना आता योग्य पद्धतीने समजावण्याची आवश्यकता आहे. या अधिवक्त्यांना साधना शिकवली, तर असे प्रश्न उद्भवणारच नाहीत. आम्हा भारतियांना आता साधनेकडे पुन्हा वळले पाहिजे. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी जनतेने साधनारत होणे आवश्यक आहे. साधूसंतांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण मार्गक्रमण केले पाहिजे. यासाठी अधिवक्त्यांना धर्मशिक्षण मिळाले पाहिजे !

– श्री. विनायक ठिगळे, वडूज, जिल्हा सातारा.