स्वतःला ‘सहिष्णु’ म्हणवणारे हिंदू निद्रावस्थेतून बाहेर कधी येणार ?

कु. म्रिणालिनी देवघरे

अभिनेत्री करिना कपूर खान यांनी स्वतःच्या गरोदरपणाविषयी ‘Kareena kapoor Khan’s Pregnancy Bible’ हे पुस्तक छापले आहे. या पुस्तकाच्या नावातील ‘बायबल’ या नावामुळे ख्रिस्ती लोकांनी ‘आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या’, असा आरोप केला आहे. ख्रिस्ती लोकांनी केवळ आरोप करत न थांबता त्यांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आणि अभिनेत्री करिना कपूर खान यांना उच्च न्यायालयाने नोटीसही बजावली आहे.

या प्रसंगावरून लक्षात येते की, अन्य धर्मियांची त्यांच्या धर्माप्रती सतर्कता आणि जागरूकता किती आहे ! हिंदू असे कधी जागे होतील ? जेव्हा हिंदु देवतांचे विडंबन होते किंवा विविध विज्ञापनांमधून हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या जातात, त्या वेळेला कुणीही अशा तत्परतेने कृती करत नाही. या पुस्तकाच्या नावावरून करिना कपूर खान यांचा आणखी एक वेगळा उद्देश लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे त्या स्वतः मूळतः हिंदु, त्यांचे लग्न झाल्यानंतर त्या मुसलमान आहेत आणि पुस्तकावर ‘ख्रिस्ती’ धर्मग्रंथाचा उल्लेख केला आहे, यातून त्या हिंदूंसमोर कथित ‘सर्वधर्मसमभावा’चा पुरस्कार करत आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हिंदूंच्या कितीतरी वेळा धर्मभावना दुखावल्या जातात, तेव्हा अशा पद्धतीने कुणी लगेच पाऊल का उचलत नाही ? हिंदूंना ‘सहिष्णु’, ‘सहिष्णु’, असे म्हटले जात असल्याने हिंदूंची वाटचाल आता निद्रावस्थेकडे होत आहे.

– कु. म्रिणालिनी देवघरे, फोंडा, गोवा. (१८.५.२०२४)