स्वार्थासाठी आणि दुसर्‍यांना खुश ठेवण्यासाठी विवेकबुद्धीचा वापर न करण्याची प्रवृत्ती म्हणजे ज्ञानेश महाराव !

प्रभु श्रीरामाविषयी अश्‍लाघ्‍य विधान करणारे ज्ञानेश महाराव

‘धोब्याचे ऐकून गरोदर पत्नीला घराबाहेर काढणार्‍या व्यक्तीची आपण मंदिरे बांधतो, हे लज्जास्पद आहे’, असे विधान एका साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळणारे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांनी केले तेही एका अधिवेशनात ! याचे कारण अध्यात्मशास्त्राविषयी असणारे अज्ञान ! त्यामुळे सर्व शक्तीमान एकच तो परमात्मा याची न झालेली ओळख ! स्वतःच्या आत्म्याला मारून, सत्याचा गळा घोटून, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि दुसर्‍यांना खुश ठेवण्यासाठी विवेकबुद्धीचा वापर न करण्याची प्रवृत्ती, स्वार्थी मन अन् बुद्धी यांवर बांधलेली पट्टी, स्वतःहून चढवून घेतलेले आवरण, अशी महाराव यांची स्थिती आहे. अशा देहबुद्धीत जीवन व्यथित करणार्‍यांना ‘चार्वाक’ यांचे ‘खावो, पियो, मजा करो’, हे तत्त्वज्ञान नसानसांत भिनलेल्या, केवळ आणि केवळ इंद्रिय विषयांच्या सुखात रमणार्‍या, देहबुद्धीवाल्या व्यक्तींना आत्मबुद्धीत सतत स्थित असणार्‍या प्रभु श्रीरामांचे अंतर्मन आणि अंतःकरण कसे जाणता येणार ? अशांना श्रीरामांचे तत्त्वज्ञान कसे समजणार ? महाराव यांनी डोळ्यांवर जसा चष्मा चढवला आहे, तसेच त्यांना दिसणार. व्यक्तीचा चष्मा पालटण्याचे कार्य केवळ न केवळ ‘अध्यात्मशास्त्र’च करू शकते. म्हणून शैक्षणिक अभ्यासक्रमात ‘अध्यात्मशास्त्रा’चा समावेश हवा. जे शास्त्र सर्व बाजूंनी मिळणारे ज्ञान, माहिती आणि हे मिळवलेले ज्ञान अन् शास्त्र कसे वापरावे, हे शिकवते ते अध्यात्मशास्त्र !

तूर्तास अशा देहबुद्धीवाल्यांना सद्बुद्धी होऊन अध्यात्मज्ञान प्राप्तीची जिज्ञासा निर्माण व्हावी, त्यांचे अज्ञान दूर होऊन सत्य कळावे आणि प्रभु श्रीरामांचे तत्त्वज्ञान समजून घेण्याची ‘वृत्ती’ व्हावी अन् त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी, हीच प्रार्थना !’

– श्री. अनिल वामन सावंत, मुलुंड (पूर्व), मुंबई.