राज्यसभेत मागणी करतांना भाजपच्या खासदार रूपा गांगुली यांना अश्रू अनावर !

नवी देहली – आम्ही बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतो. तेथे सामूहिक हत्या होत आहेत. लोक तिथून पळून जात आहेत. ते राज्य आता रहाण्यायोग्य राहिलेले नाही, असे राज्यसभेत सांगतांना भाजपच्या खासदार रूपा गांगुली यांचे अश्रू अनावर झाले. त्या बंगालमधील बीरभूम येथील रामपूरहाट येथे तृणमूल काँग्रेसचे पंचायत सदस्य भादू शेख यांच्या हत्येनंतर १२ घरांना आग लावून ८ जणांना जिवंत जाळण्याच्या घटनेविषयी बोलत होत्या.
सौजन्य : HW News English
रूपा गांगुली पुढे म्हणाल्या की, बंगालमधील लोक उघडपणाने बोलूही शकत नाहीत. तेथील सरकार नराधमांना संरक्षण देत आहे. निवडणूक जिंकल्यानंतर सरकार स्वतःच्याच राज्यातील लोकांना मारते, असे चित्र इतर राज्यांमध्ये पहायला मिळत नाही.
शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन