मुंबई – प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेच्या वेळेत पालट करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सर्वांसाठी लोकलगाड्यांची सुविधा चालू झाली; मात्र वेळेची मर्यादा घालण्यात आल्याने नोकरदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या या निर्णयावर मुंबईकरांकडून तीव्र अप्रसन्नता व्यक्त होत आहे. गर्दी टाळण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असले, तरी वेळेच्या मर्यादा घालूनही गर्दी कायम आहे. अनुमाने २५ लाख प्रवाशांना कामाच्या ठिकाणी पोचता आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी मुंबईकरांच्या सोयीनुसार लोकलच्या वेळेत लवकरच पालट करण्यात येतील. त्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला जाईल, असे ते म्हणाले.