रेल्वेगाड्यांमध्ये प्रति प्रवासी सामान नेण्याचा नियम निश्‍चित

नवी देहली – रेल्वेगाड्यांमधील स्लीपर कोच, तसेच अन्य गाड्यांमध्ये टियर-२ सामान नेण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने नियम निश्‍चित केले आहेत. प्रवाशाच्या तिकिटानुसार त्याने न्यायच्या सामानाचे वजन निश्‍चित केले जाते आणि त्यानुसार रेल्वेगाडीमध्ये सामान नेले जाऊ शकते. तिकिटाच्या मर्यादेपेक्षा अधिक सामान नेल्यास दंड भरावा लागेल. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार स्लीपर कोचमध्ये प्रति प्रवासी ४० किलो सामान ठेवू शकतो, तसेच फर्स्ट क्लास कोचमधील प्रत्येक प्रवासी ७० किलोपर्यंत सामान घेऊन जाऊ शकतो. एखाद्या प्रवाशाने मर्यादेपेक्षा अधिक सामान वाहून नेले, तर त्याला ५०० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी ६०० रुपयांपेक्षा अधिक दंड भरावा लागू शकतो. हा दंड अंतराच्या आधारावर ठरवला जातो.