नवी देहली – आजकाल बहुतेक लोक ‘ऑनलाईन’ तिकीट आरक्षण करतात. अशा परिस्थितीत रेल्वेने तिकीट आरक्षणाच्या पालटलेल्या नियमांविषयी जागरूक असणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. ‘आय.आर्.सी.टी.सी.’ने अॅप आणि वेबसाईट यांच्या माध्यमातून तिकीट आरक्षण करण्याचे नियम पालटले आहेत. रेल्वेने पालटलेल्या नियमांनुसार वापरकर्त्यांना तिकीट आरक्षण करण्यापूर्वी भ्रमणभाष क्रमांक आणि ‘ई-मेल आयडी’ यांची पडताळणी करून घ्यावी लागेल.
एका खात्यातून २४ तिकिटे आरक्षणाची सोय
रेल्वेने एका वापरकर्त्याच्या ‘आयडी’वर एका मासामध्ये आरक्षण करण्याची तिकिटांची कमाल संख्या १२ वरून २४ पर्यंत वाढवली आहे. जर स्वतःचे खाते आधारकार्डशी जोडलेले नसेल, तर आपण केवळ १२ तिकीट आरक्षण करू शकता.