दक्षिण भारतातील पहिल्या ‘वन्दे भारत’ रेल्वेला पंतप्रधानांकडून हिरवा कंदिल !

‘भारत गौरव काशी दर्शन’लाही हिरवा झेंडा !

बेंगळुरू (कर्नाटक) – पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दक्षिण भारताच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी बेंगळुरू रेल्वे स्थानकावर म्हैसूर-चेन्नई वन्दे भारत रेल्वेला ११ नोव्हेंबर या दिवशी हिरवा कंदिल दाखवला. ही देशातील पाचवी आणि दक्षिण भारतातील पहिली वन्दे भारत रेल्वे आहे. यानंतर ‘भारत गौरव काशी दर्शन’ रेल्वेलाही मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पंतप्रधानांनी बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ‘टर्मिनल-२’ चेही उद्घाटन केले. हे टर्मिनल अनुमाने ५ सहस्र कोटी रुपये खर्चून सिद्ध करण्यात आले आहे. बेंगळुरूहून ते पुढे तमिळनाडूला प्रयाण करणार आहेत. तेथे ते दिंडीगुल येथील गांधीग्राम ग्रामीण संस्थेच्या ३६ व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित रहाणार आहेत.