सिंधुदुर्ग : सावंतवाडी येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍याला अटक आणि सुटका 

सावंतवाडी येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची तक्रार गोवा रेल्वे पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने गोवा पोलिसांच्या पथकाने सावंतवाडी शहरातील देशपांडे याच्या दुकानात धाड टाकली.

कोकण रेल्‍वेच्‍या कोल्‍हापूर-वैभववाडी मार्गाला राष्‍ट्रीय नियोजन गटाचा हिरवा कंदील !

कोकण रेल्‍वेला जोडणार्‍या कोल्‍हापूर-वैभववाडी मार्गाला ‘पी.एम्. गतीशक्‍ती’ अंतर्गत शिफारस करण्‍यात आली आहे. या मार्गासाठी ३ सहस्र ४११ कोटी रुपये व्‍यय अपेक्षित आहे.

आंध्रप्रदेशमध्ये ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसमध्ये सिगारेट पेटवल्याने गोंधळ !

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतांना त्याविषयीचे प्रबोधन तेवढेच महत्त्वाचे आहे, हे रेल्वे प्रशासानाच्या लक्षात येत नाही का ? आरोपीवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, जेणेकरून इतर प्रवासी असे प्रकार करण्यास धजावणार नाही !

वातानुकूलित लोकलगाड्यांत ४ मासांत आढळले प्रतिदिन १२६ फुकटे प्रवासी !

जुलै २०२३ मध्‍ये लोकलगाड्यांमधील विनातिकीट आणि अयोग्‍य तिकीटावर प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून १५ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आला आहे.

लोकलगाडी थांबवणार्‍या महिलेविरोधात गुन्‍हा नोंद

जलद रेल्‍वेगाडी फलाट क्रमांक ४ ऐवजी २ वर आली होती. त्‍यामुळे महिलेने हा प्रकार केल्‍याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे सुमारे १५ मिनिटे रेल्‍वेगाडी एकाच ठिकाणी उभी होती.

विलंब झाल्‍यामुळे संतप्‍त प्रवाशांनी दिवा स्‍थानकावर लोकलगाडी रोखून धरली !

ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला निघाली होती; मात्र विलंब झाल्‍याने दिवा रेल्‍वेस्‍थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली. अनेक प्रवासी रेल्‍वे डब्‍याला लोंबकळत असल्‍यामुळे काही महिलांनी मोटरमनच्‍या केबिनमध्‍ये शिरून लोकल थांबवायला लावली.

पुणे-मुंबई उद्यान एक्‍सप्रेसमध्‍ये महिलेचा विनयभंग करून तिला खाली ढकलणारा अटकेत !

मध्‍य रेल्‍वेवरील पुणे-मुंबई उद्यान एक्‍सप्रेसमध्‍ये महिलेचा विनयभंग करून तिच्‍याकडील रोख रक्‍कम बळजोरीने खेचून तिला एक्‍सप्रेसमधून ढकलणारा आरोपी मनोज चौधरी (वय ३२ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दादर रेल्‍वे पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. 

कोकण रेल्वेच्या १२ स्थानकांच्या सुशोभीकरणाच्या कामांचा आज प्रारंभ होणार

यामध्ये कोकण रेल्वेमार्गावरील रायगड जिल्ह्यातील ३, रत्नागिरी जिल्ह्यातील ५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या ४ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.

गोवा : रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प रहित करण्यासाठी विरोधकांचा सरकारवर दबाव

क्षिण-पश्चिम रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण प्रकरणाला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, तरीही गोव्यात या प्रकल्पाचे काम चालू आहे. सरकारने हा प्रकल्प रहित करावा.

पनवेल-नांदेड एक्‍सप्रेसमध्‍ये प्रचंड झुरळे !

पनवेल-नांदेड एक्‍सप्रेसमध्‍ये इतक्‍या प्रचंड प्रमाणात झुरळे झाली होती की, प्रवाशांनी ‘पेस्‍ट कंट्रोल’ केल्‍याविना गाडी पुढे जाऊ देणार नाही’, अशी कठोर भूमिका घेतली.