‘एन्.आय.ए.’कडून ७ आतंकवाद्यांविरुद्ध मुंबईतील विशेष न्‍यायालयात आरोपपत्र प्रविष्‍ट !

महंमद इम्रान महंमद युसुफ खान, महंमद युनुस महंमद याकूब, कादीर दस्‍तगीर पठाण, समीब काझी, जुल्‍फीकार अली बडोदावाला, शामिल नाचन, अकिफ नाचन अशी आतंकवाद्यांची नावे आहेत.

पुणे येथे २३ सहस्र ५०० मिळकतींच्‍या करबुडव्‍यांचा शोध !

कर आकारणी न झालेल्‍या मिळकती शोधण्‍याची ही मोहीम तीव्र करण्‍यात येणार असल्‍याने महापालिकेच्‍या उत्‍पन्‍नातही वाढ होणार आहे

पुणे येथे साखळी बाँबस्‍फोट घडवून आणण्‍याचा आतंकवाद्यांचा कट !

साखळी बाँबस्‍फोट घडवून देशात सातत्‍याने घातपाती कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांचे तळ नष्‍ट करणेच आवश्‍यक !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : लोकलमध्‍ये ब्‍लेडने आक्रमण ; ‘मॅफेड्रॉन’ विकणारा धर्मांध अटकेत !…

येथील कोपरी गाव परिसरात ‘मॅफेड्रॉन’ हा अमली पदार्थ विकणार्‍या सोएब महंमद सलीम अन्‍सारी (वय २१ वर्षे) याला अटक करण्‍यात आली आहे. त्‍याच्‍याकडून ५ लाख ११ सहस्र रुपयांचा ऐवज जप्‍त केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये होणार्‍या सर्व कार्यक्रमांना आता पूर्वअनुमती बंधनकारक !

विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली धक्काबुक्की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये गेल्या ३ दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे मेट्रोच्‍या कामाचे प्रत्‍येक वेळी संरचनात्‍मक लेखापरीक्षण नको ! – श्रावण हर्डीकर, ‘महामेट्रो’चे व्‍यवस्‍थापकीय संचालक

ट्रोच्‍या कामाचे प्रत्‍येक वेळी स्‍ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्‍मक लेखापरीक्षण) करणे बंधनकारक नाही. प्रत्‍येक कामाचे संरचनात्‍मक लेखापरीक्षण केल्‍यानंतरच ‘मेट्रो’ चालू केली जाते, असे ‘महामेट्रो’चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पुणे कॅन्‍टोन्‍मेंटच्‍या कर्मचार्‍यांना ५ वर्षांपासून ‘पी.एफ्.’चे विवरणपत्र मिळेना !

५ वर्षांपासून शेकडो कर्मचार्‍यांना ‘पी.एफ्.’चे विवरणपत्र न मिळणे, हे गंभीर आहे. कर्मचार्‍यांच्‍या अडचणी वेळीच न सोडवणार्‍यांना कठोर शिक्षा केली पाहिजे !

कोथरूड (पुणे) येथील व्‍यावसायिकाकडे खंडणी मागणार्‍यांना अटक !

मंचर (जि. पुणे) येथील संतोष जाधव हा बिष्‍णोई टोळीतील गुन्‍हेगार असून सध्‍या तो महाराष्‍ट्र संघटित गुन्‍हेगारी नियंत्रण कायद्यान्‍वये (मोक्‍का) कारागृहामध्‍ये आहे.

अजित पवार यांच्याविषयी पुस्तकात लिहिल्याने पुणे येथील कार्यक्रमाचे निमंत्रण रहित ! – मीरा बोरवणकर, माजी आय.पी.एस्. अधिकारी

मीरा बोरवणकर लिखित ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात राजकीय प्रकरणांशी निगडित अनेक विधाने आहेत. एका विधानात नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर हे ‘दंगल कशी घडवून आणायची ?’ याविषयी चर्चा करत असल्याचे म्हटले आहे.

ललित याला पळवून लावण्यात कोणत्याही डॉक्टरांचा सहभाग नाही ! – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

अधिष्ठाता संजीव ठाकूर म्हणाले, ‘‘ललित पाटीलसारखे असंख्य आरोपी आमच्याकडे येत असतात. माझ्यासह कुठल्याही आधुनिक वैद्याचा कधीही संबंध नव्हता आणि येणार नाही. ललित याला पळवून लावण्यात कुणाचेही आर्थिक हितसंबंध नाहीत.’’