स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदु राष्‍ट्र निर्मितीस उपयुक्‍त विचार ‘स्‍वयंभू’ अंकात आहेत ! – डॉ. नीलेश लोणकर

सनातन संस्‍थेच्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍या शुभहस्‍ते स्‍वयंभू दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्‍यात आले. या सोहळ्‍याला १२५ हून अधिक जणांची उपस्‍थिती होती. प्रारंभी सनातन संस्‍थेच्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्‍या शुभहस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुंबईत फटाके फोडण्‍याची वेळ रात्री ८ ते १० !; नाशिक येथे ३९७ किलो बनावट पनीर !…

९७ किलो बनावट पनीर अन्‍न आणि औषध प्रशासनाने हस्‍तगत केले आहे. या पनीरचे मूल्‍य ८४ सहस्र रुपयांहून अधिक आहे. बनावट पनीरचे नमुने विश्‍लेषणासाठी पाठवण्‍यात आले असून बाकी साठा नष्‍ट करण्‍यात आला आहे.

पुणे शहरातील १ सहस्र ८२६ पैकी केवळ २४५ होर्डिंग्‍जचे नूतनीकरण !

विज्ञापनांमुळे कोट्यवधी रुपयांचा लाभ कमावणारी आस्‍थापने सर्व नियम धाब्‍यावर बसवतात, हे लज्‍जास्‍पद ! नियमांचे पालन न करणार्‍या आस्‍थापनांवर कठोर कारवाई करा !

पुणे येथे विनाअनुमती लावलेल्‍या फलकधारकांकडून ५ वर्षांचे शुल्‍क आकारणार ! – उपायुक्‍त माधव जगताप

महापालिकेच्‍या आकाशचिन्‍ह विभागाकडून शहरातील विज्ञापन फलकांची (होर्डिंग) पडताळणी करण्‍यात येणार आहे. जे विनाअनुमती विज्ञापन फलक आहेत त्‍यांना अनुमती देतांना मागील ५ वर्षांचे शुल्‍क वसूल केले जाईल.

पुणे परिवहन विभागाकडून खासगी ट्रॅव्‍हल्‍सनी अधिकचे भाडे आकारल्‍याच्‍या तक्रारीसाठी हेल्‍पलाईन क्रमांक !

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आर्.टी.ओ.) निश्‍चित करून दिलेल्‍या कमाल तिकिट दरापेक्षा अधिक तिकिट रक्‍कम वसूल करणार्‍या खासगी वाहतूकदारांवर कारवाई करणार. तक्रारदारांनी थेट परिवहन विभागाच्‍या ‘८२७५३०३१०१’ या भ्रमणभाष क्रमांकावर ‘व्‍हॉट्‌सअ‍ॅप’या सामाजिक माध्‍यमातून तक्रार करावी.

व्‍यावसायिक अभ्‍यासक्रमांच्‍या महाविद्यालयांना शुल्‍क नियामक प्राधिकरणाने निश्‍चित केलेलेच शुल्‍क घेणे बंधनकारक !

महाविद्यालयांच्‍या मनमानी शुल्‍क आकारणीला आळा बसण्‍यासाठी घेतलेला निर्णय स्‍तुत्‍यच आहे !

पुणे येथील रेल्‍वेच्‍या जागेतील अवैध संस्‍थेत मुलींवर अत्‍याचार !

रेल्‍वेच्‍या जागेत अवैध संस्‍था चालू होईपर्यंत रेल्‍वे प्रशासन काय करत होते ? अशा प्रकारे अवैध संस्‍था काढून सुरक्षादलातील हवालदारच अल्‍पवयीन मुलींवर अत्‍याचार करत असतील, तर महिला कधीतरी सुरक्षित रहातील का ?

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍पाकरता ५३० कोटी रुपयांचे कर्ज कशासाठी ? – सजग नागरिक मंच

अधिक व्‍याजदराचे कर्ज काढणे म्‍हणजे नागरिकांनी ‘करा’पोटी भरलेल्‍या पैशांचा अपव्‍यय नाही का ? असे करण्‍यामागचे कारण पुणे महापालिका प्रशासन स्‍पष्‍ट करील का ?

राज्‍यातील व्‍यावसायिक महाविद्यालयांना अतिरिक्‍त शुल्‍क न आकारण्‍याच्‍या सूचना !

महाविद्यालयांनी अशा प्रकारे अतिरिक्‍त शुल्‍क का आकारले, हेही पहाणे आवश्‍यक आहे ? अतिरिक्‍त शुल्‍क आकारल्‍याविषयीही दंड ठोठावावा !