लॉरेन्स बिष्णोई टोळीतील संतोष जाधव याच्या नावाचा वापर
पुणे – पंजाब, राजस्थानमधील लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित संतोष जाधव याच्या नावाने कोथरूड येथील एका व्यावसायिकाकडे १५ लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना कह्यात घेतले आहे. याविषयी व्यावसायिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. मंचर (जि. पुणे) येथील संतोष जाधव हा बिष्णोई टोळीतील गुन्हेगार असून सध्या तो महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारागृहामध्ये आहे. जाधव याने पूर्ववैमन्यातून ओंकार उपाख्य राण्या बाणखेले यांची हत्या केली होती.