पुणे कॅन्‍टोन्‍मेंटच्‍या कर्मचार्‍यांना ५ वर्षांपासून ‘पी.एफ्.’चे विवरणपत्र मिळेना !

पूर्णवेळ कर्मचारी नसल्‍याचा परिणाम

भविष्‍य निर्वाह निधी

पुणे – कॅन्‍टोन्‍मेंटच्‍या ‘भविष्‍य निर्वाह निधी’ (पी.एफ्.) कार्यालयामध्‍ये पूर्णवेळ कर्मचारी नाहीत. त्‍यामुळे कायमस्‍वरूपी कर्मचार्‍यांना गेल्‍या ५ वर्षांपासून ‘पी.एफ्.’चे विवरणपत्र मिळालेले नाही. ‘पी.एफ्.’विषयी कोणतीही माहिती मिळू न शकल्‍याने ‘पी.एफ्.’ सुरक्षित आहे का ? असा प्रश्‍न कर्मचार्‍यांना पडला आहे.

पुणे कॅन्‍टोन्‍मेंटमध्‍ये अनुमाने ७०० कर्मचारी कायमस्‍वरूपी आहेत. वर्ष २०१८ पर्यंत त्‍यांना प्रतिवर्षी हे विवरणपत्र मिळत होते. त्‍यानंतर एकदाही विवरणपत्र मिळाले नाही, असे कर्मचार्‍यांनी सांगितले आहे. ‘पी.एफ्.’ची रक्‍कम मिळत नसल्‍याने नागरिक त्रस्‍त होत आहेत.

संपादकीय भूमिका

५ वर्षांपासून शेकडो कर्मचार्‍यांना ‘पी.एफ्.’चे विवरणपत्र न मिळणे, हे गंभीर आहे. कर्मचार्‍यांच्‍या अडचणी वेळीच न सोडवणार्‍यांना कठोर शिक्षा केली पाहिजे !