काश्मीरमधील अल्पसंख्यांकांच्या हत्या आणि हिंदूंचा नरसंहार यांविरोधात पुणे येथे आंदोलन !

ज्या जिहादमुळे काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, त्या जिहादच्या मुळावर प्रहार करावा लागेल, अन्यथा काश्मीरच्या विकासाला काहीच अर्थ रहाणार नाही’, अशी मागणीही आंदोलनात सहभागी झालेल्यांनी सरकारला केली.

पेट्रोलच्या अवैध विक्री व्यवसायाविरोधात बातमी दिल्याच्या रागातून पुणे येथील पत्रकाराची हत्या करणार्‍यास ५ वर्षांची शिक्षा !

आरोपीने मृत पत्रकाराच्या घायाळ भावाला ३० सहस्र रुपये हानीभरपाई द्यावी, असेही निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.

आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाल्यावरच मी पुराव्यानिशी बोलेन ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘मी कुठेही पळून जाणार नाही, तसेच मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. यासंदर्भात मला कोणतीही सूचना, नोटीस आलेली नाही. आयकर विभागाच्या अधिकार्‍यांची चौकशी संपली की, मी पुराव्यानिशी बोलेन’, अशा शब्दांत आयकर विभागाकडून होत असलेल्या कारवाईच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले.

पुणे येथील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह १४ जणांवर गुन्हा नोंद !

जमीन दस्त, तसेच नोंदणीत उल्लंघन करून दिशाभूल केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी सहदुय्यम निबंधक एल्.एम्. संगावार यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला ५० लाखांची खंडणी मागणार्‍याला अटक !

व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या रूपेश चौधरी यास युनिट १ च्या गुन्हे शाखेने अटक केली. यापूर्वी त्याच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद आहे.

खंडणी मागणार्‍या एका सराईत गुन्हेगारासह तिघांना पुणे येथे अटक !

गुन्हेगारी टोळीचा जम बसवण्यासाठी व्यावसायिकाकडे २ लाख रुपयांची खंडणी मागून तडजोडीअंती १ लाख रुपये घेणार्‍या एका सराईत गुन्हेगारासह तिघांना पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

आयकर विभागाकडून अजित पवारांशी संबंधित साखर कारखान्यांवर धाडी !

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आणि निकटवर्तियांच्या साखर कारखान्यांमध्ये आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.

जेजुरीच्या खंडोबाचे प्रतिदिन २० सहस्र भाविकांना दर्शन मिळणार !

भाविकांना दर्शन रांगेतूनच योग्य ते अंतर ठेवत केवळ मुखदर्शन घेता येणार आहे. १० वर्षांखालील मुले-मुली आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच गर्भवती स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या लेखी परीक्षेत बनावट (डमी) विद्यार्थी बसल्याचे उघडकीस !

कागदपत्र आणि छायाचित्र यांची पडताळणी केली असता तो बनावट असल्याचे लक्षात आले.

पुणे येथील सनातन संस्थेच्या साधक विद्यार्थिनीचे सनदी लेखापालच्या परीक्षेत सुयश !

येथील सातारा रस्ता केंद्रातील १९ वर्षीय कु. सुहासिनी सुनील कुंभार हिने सनदी लेखापालच्या (सी.ए.) प्रथम सत्रातील परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन केले आहे. तिने अभ्यासाला आरंभ करण्यापूर्वी प्रार्थना-कृतज्ञता व्यक्त करणे, अथर्वशीर्ष ऐकणे, नामजपादी उपाय असे आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न केले.