जेजुरीच्या खंडोबाचे प्रतिदिन २० सहस्र भाविकांना दर्शन मिळणार !

भाविकांना दर्शन रांगेतूनच योग्य ते अंतर ठेवत केवळ मुखदर्शन घेता येणार आहे. १० वर्षांखालील मुले-मुली आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच गर्भवती स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या लेखी परीक्षेत बनावट (डमी) विद्यार्थी बसल्याचे उघडकीस !

कागदपत्र आणि छायाचित्र यांची पडताळणी केली असता तो बनावट असल्याचे लक्षात आले.

पुणे येथील सनातन संस्थेच्या साधक विद्यार्थिनीचे सनदी लेखापालच्या परीक्षेत सुयश !

येथील सातारा रस्ता केंद्रातील १९ वर्षीय कु. सुहासिनी सुनील कुंभार हिने सनदी लेखापालच्या (सी.ए.) प्रथम सत्रातील परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन केले आहे. तिने अभ्यासाला आरंभ करण्यापूर्वी प्रार्थना-कृतज्ञता व्यक्त करणे, अथर्वशीर्ष ऐकणे, नामजपादी उपाय असे आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न केले.

सिंहगड रस्त्यावरील (पुणे) ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्या वर्षीचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !

इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा मुजोरपणा अल्प करण्यासाठी अशा शाळा प्रशासनावर तत्परतेने कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

हडपसर (पुणे) येथे पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राला पेट्रोल टाकून जाळले !

पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या करणे हे अराजकतेचे लक्षण आहे !

पुणे येथील चतुःशृंगी मंदिरात कोरोनाविषयक नियमांचे पालन करून घटस्थापनेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ

७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ८ वाजता अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापना करण्यात येणार असून, प्रतिदिन सकाळी १० आणि रात्री ८ वाजता महाआरती करण्यात येणार आहे.

कायदा हातात घेणार्‍यांच्या विरुद्ध कडक कारवाई करा ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री यांची चेतावणी

कुणी अविचारी तरुण कायदा हातात घेऊन अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याविरुद्ध कडक कारवाई करा, अशी ताकीद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिली.

भारतीय सैनिकांनी वर्ष १९७१ च्या युद्धात मिळवलेल्या विजयाची जगाच्या इतिहासात नोंद !

वर्ष १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धातील विजयाला आणि बांगलादेश निर्मितीला ५० वर्षे पूर्ण झाल्याने हे वर्ष ‘स्वर्णिम विजय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे.

तक्रारदारावर दबाव आणल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी निलंबित !

तक्रारदारावर दबाव आणणारे पोलीस कधी सामान्यांना आधार वाटू शकतील का ?