पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला ५० लाखांची खंडणी मागणार्‍याला अटक !

पुणे, ९ ऑक्टोबर – येथील एका प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाला त्यांच्या ग्रुपमधील एका आस्थापनाने डी.एच्.एल्.एफ्. यांच्याकडून घेतलेल्या ६८ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात घोटाळा झाला आहे. त्यावर आयकर विभागाने आक्षेप घेत, ईडी आणि एस्.एफ्.आय.ओ. यांनी त्रुटी काढल्या आहेत, असा बनाव रचत हे प्रकरण मिटवण्यासाठी व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या रूपेश चौधरी यास युनिट १ च्या गुन्हे शाखेने अटक केली. यापूर्वी त्याच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ११ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि इतर आरोपींचा शोध चालू आहे.