सौराष्ट्रामधून आलेल्या वार्‍यामुळे हवेत सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण वाढले ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांसह इतर आमदारांनी राज्यातील प्रदूषणाची पातळी वाढत असल्याविषयीचा प्रश्न विचारला होता.

कोल्हापूर येथील पंचगंगा नदी प्रदूषणास उत्तरदायी असणार्‍या घटकांवर कारवाई करा ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

पंचगंगेचे पाणी प्रदूषित झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पसरला आहे. या संदर्भात पर्यावरणमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत हे आदेश दिले.

बिहारमधील ३८ पैकी ३१ जिल्ह्यांतील पाणी पिण्यायोग्य नाही !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जनतेला साधे पिण्याचे पाणीही देऊ न शकणे, हेे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिन ७७ लक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जाते !

हा जिल्हा बहुतांश मत्स्याहारी असल्याने प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता थेट समुद्र, नदी यांत सोडले जाते. पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याला, जिवाला धोका निर्माण झाला आहे. हे मासे बाहेरही पाठवले जात असल्याने त्याची व्याप्तीही वाढत आहे.

पंचगंगेच्या रूकडी (जिल्हा कोल्हापूर) बंधार्‍यावर शेकडो मृत माशांचा खच !

हिंदूंच्या गणेशोत्सव, तसेच अन्य सणांमुळे प्रदूषण होते, अशी आरोळी ठोकणारे कथित पर्यावरणप्रेमी, तसेच अंनिससारख्या संघटना अशा वेळी गप्प बसतात, यातून हे सर्व हिंदुद्वेषी आहेत, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते  काय ?

पवित्र नद्या प्रदूषणमुक्त करा !

भारतामध्ये नद्यांचे आध्यात्मिक माहात्म्य अनन्यसाधारण आहे. समाजामध्ये याविषयी श्रद्धा आहे आणि ते त्यादृष्टीने नद्यांकडे पहातात. प्रशासनाने भाविकांचा भाव आणि स्वच्छ पाणी ही प्राथमिक आवश्यकता समजून नद्या समयमर्यादा ठेवून स्वच्छ कराव्यात, हीच अपेक्षा !

पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नी प्रदूषण मंडळाची महापालिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस !

नेहमीप्रमाणे प्रदूषण मंडळाची ‘वरातीमागून घोडे’ याप्रमाणे कारवाई !

कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा भाजपचा प्रयत्न !

महानगरपालिकेकडे साठलेला आणि कुठलीही प्रक्रिया न केलेला कचरा बावडा परिसरातील शेतामध्ये पसरल्याचा प्रकार उघडकीस आणला होता.

पुणे येथील हवेची गुणवत्ता ढासळली !

शहरातील अनेक ठिकाणी अतीसूक्ष्म धूलीकण (पी.एम्. २.५) आणि सूक्ष्म धूलीकण यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २४ जानेवारी या दिवशी हवेची गुणवत्ता ३७४ प्रतिघनमीटर इतकी नोंदवली गेली.

इचलकरंजी येथे पंचगंगा नदीत प्रदूषणामुळे प्राणवायूअभावी माशांची तडफड आणि मृत्यू !

यामुळे कोल्हापूरसह इचलकरंजी येथेही पाणी प्रदूषण रोखण्यात प्रशासन असमर्थ ठरत असून प्रदूषण विभागही डोळेझाक करत असल्याचे निदर्शनास येत आहे.