हेमंत नगराळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार

हेमंत नगराळे हे वर्ष १९८७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी वर्ष १९९८ ते २००२ या कालावधीत केंद्रीय अन्वेषण यंत्रणेमध्येही काम केले. प्रारंभी मुंबई येथे, त्यानंतर देहली येथे उपमहासंचालकपदाचे दायित्व त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

शेळ-मेळावली येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा गोवा सुरक्षा मंचकडून निषेध

शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा गोवा सुरक्षा मंचकडून ‘गोवा शासनाने या आंदोलकांविरुद्ध केलेली कृती अन्यायकारक आणि लोकशाहीविरोधी आहे’, या शब्दांत निषेध करण्यात आला आहे.

फोंडा पोलीस ठाण्यात धर्मांधाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार नोंद

पिळये, धारबांदोडा येथील एक अल्पवयीन मुलगी गायब झाल्यासंबंधीची तक्रार ७ जानेवारी या दिवशी फोंडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आरोपी आणि गायब झालेली मुलगी यांचा पोलीस शोध घेत असून अजून त्याविषयी काही माहिती मिळालेली नाही.

महिला पोलिसावर प्राणघातक आक्रमण करणार्‍या चौघांविरोधात गुन्हा नोंद

जिथे महिला पोलीसच असुरक्षित असतील, तिथे सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल ?

सांगलीत एफ्आरपी आंदोलनाच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पोलिसांमध्ये झटापट

आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गव्हाणीत उड्या टाकण्याचे आंदोलन स्थगित केले.

गोवंशियांचे मांस घेऊन जाणार्‍या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद

पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथे गोवंशियांची अवैधपणे कत्तल करून ३ सहस्र ५०० किलो मांस वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध टेम्पोचालक सुफियान अन्सारी आणि अश्फाक मोहम्मद यांना कह्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा धर्मांध तडीपार

गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा धर्मांध लाल अहमद महिबूब कुरेशी याची विविध स्तरांवर चौकशी होऊन पोलीस उपायुक्त (परिमंडळ) सोलापूर यांनी त्यास सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका येथून एक वर्षासाठी तडीपार आदेश जारी केला आहे.

मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे सांगत विवाह केलेल्या हिंदु तरुणीचा विवाहानंतर ३ मासांत संशयास्पद मृत्यू

लव्ह जिहादविरोधी कायद्याला विरोध करणारे निधर्मीवादी अशा घटनांविषयी तोंड का उघडत नाहीत ?

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा न नोंदवल्याने मिळालेल्या जामिनानंतर त्याच्याकडून पुन्हा त्याच मुलीवर बलात्कार !

बाल कल्याण समितीच्या दबावानंतर पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवला.

ओडिशा येथे मंदिरांतील देवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

सातत्याने हिंदूंच्या मंदिरांतील मूर्तींची तोडफोड होऊनही सर्वत्रचे हिंदू शांत ! निषेध नाही कि विरोध नाही ! अशा निद्रिस्त हिंदूंना आपत्काळात देवाने तरी का वाचवावे ? मंदिरांचे रक्षण करू न शकणारे हिंदू स्वतःच्या घराचे आणि देशाचे रक्षण काय करणार ?