पंढरपूर – १२ नोव्हेंबर या दिवशी असलेल्या कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीदेवी यांचे २४ घंटे दर्शन चालू करण्यात आले असून ते २० नोव्हेंबरपर्यंत चालू रहाणार आहे. ४ नोव्हेंबरला विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला. आता श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तसेच रुक्मिणीमातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. श्रींचा पलंग काढण्यात आल्याने आता काकड आरती, पोशाख, धुपारती, शेजारती असे नित्योपचार बंद होऊन पहाटे ४ ते ५ या वेळेत नित्यपूजा, सकाळी १०.४५ ते ११.१५ पर्यंत महानैवेद्य, रात्री ८.३० ते ९ या वेळेत लिंबूपाणी/गंधाक्षता हे राजोपचार चालू ठेवण्यात येत आहेत.