कुलगाममध्ये २ आतंकवादी शरण

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोएबाच्या २ स्थानिक आतंकवाद्यांनी ‘त्यांच्या कुटुंबियांच्या आवाहनानंतर आत्मसमर्पण केले’, असे पोलिसांनी सांगितले.

महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात सनातनच्या साधकांची पोलिसांकडून चौकशी

धर्मप्रसार करणार्‍या संस्थेच्या साधकांची चौकशी करणार्‍या पोलिसांनी जर धर्मांधांची अशा प्रकारे कसून चौकशी केली असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता !

पुण्यात १ कोटी रुपयांचा चरस जप्त; लोहमार्ग पोलिसांची कारवाई

नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर देहलीहून रेल्वेतून महाराष्ट्र्रात आणण्यात आलेला अनुमाने १ कोटी रुपये मूल्याचा चरस पुण्यात लोहमार्ग पोलिसांनी जप्त केला आहे.

जमावबंदी असतांना मिरवणूक काढल्याने सातारा येथील भाजप सरपंचांसह ५२ जणांवर गुन्हा नोंद

सरपंचच नियमांचे पालन करत नसतील, तर ते समाजाकडून नियमांचे पालन कसे करून घेतील ? नियम मोडणारे नाही, तर नियमांचे पालन करणारेच लोकप्रतिनिधी हवेत !

तमिळनाडूतील प्राचीन मंदिरात तोडफोड करून चोरी

गेल्या ७३ वर्षांतील सर्वच शासनकर्ते मंदिरांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले असल्याने मंदिरांच्या सुरक्षेसाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्य वाहतुकीविरोधात धडक कारवाई मोहीम

 ६० लाखांचा देशी आणि विदेशी मद्याचा साठा हस्तगत

अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा विशेष पोलीस महानिरीक्षकांचा आदेश

अवैध कृत्यांवर आळा बसवणे हे पोलीस दलाचे काम असतांना वाहतूक पोलीस आणि पोलीस तपासणी नाक्यावर लक्ष ठेवण्यासाठी पुन्हा नवीन पथकाची नियुक्ती म्हणजे कार्यरत असलेले पोलीस त्यांचे काम योग्य प्रकारे करत नसल्याचे स्पष्ट होते !

‘टीआरपी’ घोटाळ्याप्रकरणी पोलिसांची ‘बार्क’च्या कार्यालयात धडक

रिपब्लिक टी.व्ही.चे आर्थिक चढउतार पडताळण्यासाठी पोलिसांनी ‘फॉरेन्सिक ऑडिट’चा अहवाल मागितला

ज्येष्ठ नागरिकांना विविध सेवा पुरविणार्‍या ‘केअर टेकर एजन्सी’वर पोलिसांची नजर ! – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवणार्‍या काही ‘केअरटेकर एजन्सी’ अपप्रकार करत असल्याचे आढळले आहे. त्यांचा शोध घेऊन, त्यांची सखोल चौकशी करून दोषी असणार्‍या एजन्सीवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.