ओडिशा येथे मंदिरांतील देवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

तोडफोडीच्या प्रकरणी लोकांचा ख्रिस्ती मिशनर्‍यांवर आरोप

  • ही तोडफोड आंधप्रदेश राज्याला लागू असलेल्या ओडिशाच्या गावात झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून आंध्रप्रदेशमध्ये हिंदूंच्या मंदिरांच्या तोडफोडीच्या १२० हून अधिक घटना घडल्या आहेत आणि आता हे लोण ओडिशामध्ये पोचत आहे, असे वाटते ! आता केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून मंदिरांचे आणि हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींचे रक्षण करावे !
  • सातत्याने हिंदूंच्या मंदिरांतील मूर्तींची तोडफोड होऊनही सर्वत्रचे हिंदू शांत आहेत ! निषेध नाही कि विरोध नाही ! अशा निद्रिस्त हिंदूंना आपत्काळात देवाने तरी का वाचवावे ?
  • मंदिरांचे रक्षण करू न शकणारे हिंदू स्वतःच्या घराचे आणि देशाचे रक्षण काय करणार ?
अज्ञातांनी तोडफोड केलेली श्री लक्ष्मीदेवी आणि श्री सरस्वतीदेवीची मुर्ती

रायगड (ओडिशा) – ओडिशामधील आंधप्रदेश राज्याच्या सीमेवर असणार्‍या रायगड जिल्ह्यातील हुकुमटोला गावामध्ये अज्ञातांनी भगवान रामेश्‍वर महादेव मंदिरातील श्री सरस्वतीदेवी, श्री लक्ष्मीदेवी आणि श्री वृंदावतीदेवी यांच्या मूर्तींची तोडफोड केली.

रात्रीच्या वेळी ही घटना घडली. सकाळी मंदिराचे पुजारी मंदिरात आले असता ही घटना उघडकीस आली. मंदिर व्यवस्थापन समितीने मंदिरांतील सोन्याचे दागिनेही चोरी झाल्याचे म्हटले आहे.

(ही छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)

या घटनेचे पोलीस अन्वेषण करत आहेत. या भागात ख्रिस्ती मिशनर्‍यांचा सुळसुळाट आहे, असा दावा केला जातो. त्यामुळे या घटनेमागे त्यांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे.