अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा न नोंदवल्याने मिळालेल्या जामिनानंतर त्याच्याकडून पुन्हा त्याच मुलीवर बलात्कार !

मध्यप्रदेश पोलिसांची अक्षम्य चूक !

अशा पोलिसांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांनाही बलात्कार्‍याप्रमाणे दोषी ठरवून फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

सीहोर (मध्यप्रदेश) – येथे शाहरूख खान नावाच्या २२ वर्षाच्या तरुणाने एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याला अटकही झाली. न्यायालयाने त्याला या प्रकरणी जामीन दिल्यावर पुन्हा त्याने या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली.

 

पोलिसांवर आरोप आहे की, मुलगी अल्पवयीन असतांना आरोपी शाहरूख खान याच्यावर पहिल्याच वेळी ‘पॉक्सो’ (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉर्म सेक्शुअल ऑफेन्सेस अ‍ॅक्ट) या कायद्यांतर्गत गुन्हा न नोंदवल्याने त्याला जामीन मिळाला आणि त्याने पुन्हा दुष्कृत्य केले. यानंतर बाल कल्याण समितीच्या दबावानंतर पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवला. पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवल्यावर किमान ९० दिवस जामीन दिला जात नाही.