मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे सांगत विवाह केलेल्या हिंदु तरुणीचा विवाहानंतर ३ मासांत संशयास्पद मृत्यू

लव्ह जिहादविरोधी कायद्याला विरोध करणारे निधर्मीवादी अशा घटनांविषयी तोंड का उघडत नाहीत ?

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – मुसलमान तरुणाने स्वतःचे हिंदु नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला. ३ मासानंतर या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यावर तिचा मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये सोडून त्याने पलायन केल्याची घटना येथे घडली.

तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवून या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे.