आयुर्वेद औषध ‘आयुष-६४’च्या क्लिनिकल चाचणीमध्ये ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त

कोरोनाबाधितांवर आयुर्वेदाचे औषध असणार्‍या ‘आयुष-६४’चे परिणाम समोर आले आहेत. ३० पैकी २१ म्हणजे ७० टक्के रुग्ण ५ दिवसांनंतर कोरोनामुक्त झाले. ही चाचणी जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेकडून करण्यात आली.

मालवण तालुक्यात लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ

तालुक्यात काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, तर दुसरीकडे लेप्टोस्पायरोसिसचे (लेप्टोचे) रुग्ण वाढत आहेत. मागील ८ दिवसांत तालुक्यात ६ रुग्ण आढळले आहेत. यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क बनली आहे.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती दिलासाजनक !

गेल्या ४ दिवसांपासून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती दिलासाजनक आहे. गेल्या ३ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, तसेच रुग्ण संख्याही सातत्याने घटत आहे.

लोक मास्कच योग्य पद्धतीने घालत नसतील, तर दिशानिर्देशांचा काय लाभ ? – सर्वोच्च न्यायालय

‘‘केवळ दिशानिर्देश ठरवून चालणार नाही, त्यांची कार्यवाहीही आवश्यक आहे. यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा.’’ हे न्यायालयाला का सांगावे लागते ? केंद्र सरकारला ते कळत का नाही ? कि ‘दिशानिर्देश दिले की, आपले काम संपले’, असे सरकारला वाटते ?

गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

गोव्यात कोरोनामुळे २४ घंट्यांत एकही मृत्यू झाला नाही. दिवसभरात २ सहस्र ५२० चाचण्यांपैकी १९८ जण कोरोनाबाधित आढळले. दिवसभरात १६३ रुग्ण बरे झाले. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या १ सहस्र ३४८ झाली आहे.

सिंधुदुर्गात १ डिसेंबरपासून क्षयरोग आणि कुष्ठरोग रुग्ण शोधमोहीम

जिल्ह्यात क्षयरोग आणि कुष्ठरोग रुग्ण शोधमोहीम राबवण्याकरता ७ लाख ३४ सहस्र ३१४ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण ‘आशा’ स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवक यांच्या पथकाद्वारे करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्गात १७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले

गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात १७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र २५१ झाली आहे.

तरंगत्या कॅसिनोंमधील आणखी २ कर्मचारी कोरोनाबाधित आढळले

मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंमधील आणखी २ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. २ तरंगत्या कॅसिनोंमधील प्रत्येकी १ कर्मचारी २७ नोव्हेंबर या दिवशी कोरोनाबाधित आढळला, तसेच शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्येही २७ नोव्हेंबर या दिवशी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.

गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे १ मृत्यू

गोव्यात कोरोनामुळे गेल्या २४ घंट्यांत १ मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ सहस्र ६४५ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी १५० जण कोरोनाबाधित आढळले. हे प्रमाण ५.६७ टक्के आहे. दि

पुणे येथे विमान आणि रेल्वे यांद्वारे परराज्यांतून येणार्‍या प्रवाशांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी बंधनकारक

गेल्या काही दिवसांमध्ये शहरासह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, या दृष्टीने राज्य सरकारने देहली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या ४ राज्यांतून येणार्‍या नागरिकांसाठी कोरोनाची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी ‘निगेटिव्ह’ असल्याचा अहवाल बंधनकारक केला आहे.