इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी; लोणावळ्यातून विसर्गाला प्रारंभ !

इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क रहाण्याचे आणि नदीपात्रामध्ये जनावरे, शेत पंप, अवजारे व साहित्य तात्काळ काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक येथील गोदावरी नदीला महापूर

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आल्याने रामगिरी महाराजांनी ‘गुरुपौर्णिमा कार्यक्रमात भाविकांनी येऊ नये’, असे आवाहन केले होते.

देशभरात आतापर्यंत ९ टक्क्यांहून अधिक पाऊस

पुढील ४ दिवस ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि केरळ येथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस !

हवामान खात्याने पुढील ५ दिवसांपर्यंत मध्य भारत आणि पश्‍चिम किनारपट्टी भागात पाऊस पडत रहाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटीच्या संकटातून आमदार टी. राजासिंह आणि त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले !

सिंह यांना विशेष संरक्षण व्यवस्था असल्याने भारतीय सैन्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तेथून सुखरूप बाहेर काढून श्रीनगरला पोचवले.

सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के

सोलापूर जिल्ह्याजवळ असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी ‘४.९ रिस्टर स्केल’ भूकंप झाल्याची नोंद झाली आहे.

अमरनाथ गुंफेजवळ आलेल्या पुरामुळे १६ जणांचा मृत्यू, तर ४० जण बेपत्ता

या पावसात या तळावरील काही तंबू, प्रसादालय आदींची हानी झाली. येथे बचावकार्य चालू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती  निवारण दल, पोलीस आणि नागरी प्रशासन यांचे अधिकारी अन् कर्मचारी यात सहभागी झाले आहेत

सिंधुदुर्गात धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क रहाण्याचे आवाहन !

पावसाचा जोर पहाता धरणांच्या पाणलोट क्षेत्रामधून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुढील १-२ दिवसांत सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरून पूर्ण संचय पातळीवरील अतिरिक्त पाणी धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात ओसंडून वहाणार आहे.

गोव्यात आज अतीवृष्टी होण्याची चेतावणी

सरकारने इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ८ आणि ९ जुलै या दिवशी शाळेला सुट्टी घोषित केली आहे. सरकारची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा दक्ष आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. आवश्यकता नसतांना घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.

दरड कोसळल्याने ८५ जणांचे, तर भूमीला भेगा पडल्याने ७० जणांचे स्थलांतर

पोलादपूर तालुक्यात दरड कोसळल्याने, महाड तालुक्यात भूमीला भेगा पडल्याने लोकांचे स्थलांतर करण्यात आले तसेच आसपासच्या गावांतील ५८० जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.