दरड कोसळल्याने ८५ जणांचे, तर भूमीला भेगा पडल्याने ७० जणांचे स्थलांतर

पोलादपूर तालुक्यातील घटना !

(प्रतिकात्मक चित्र)

रायगड – पोलादपूर तालुक्यातील चोळई गावात दरड कोसळल्याने २० कुटुंबांतील ८५ जणांचे स्थलांतर करण्यात आले. महाड तालुक्यातील बावळे गावात भूमीला भेगा पडल्याने ७० जणांचे स्थलांतर करण्यात आले. आसपासच्या गावांतील ५८० जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.