देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस !

नवी देहली – देशात गेल्या काही दिवसांत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अमरनाथ येथे मुसळधार पावसामुळे १६ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण बेपत्ता आहेत. महाराष्ट्रात पुरामुळे सुमारे १२८ गावांचा संपर्क तुटला आहे. देशातील उत्तराखंड, पूर्व उत्तरप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओडिशा, तेलंगाणा, आंध्रप्रदेशचा किनारपट्टी भाग तथा गुजरात, कर्नाटक आणि केरळ या राज्यांतील काही भागांत मुसळधार पाऊस झाला.

हवामान खात्याने पुढील ५ दिवसांपर्यंत मध्य भारत आणि पश्‍चिम किनारपट्टी भागात पाऊस पडत रहाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील उत्तर भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.