मोगा (पंजाब) येथे खलिस्तानी आतंकवाद्यांकडून काँग्रेसच्या नेत्याची हत्या !

याविषयी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो तोंड उघडतील का ? अर्श डल्ला याच्यावर कारवाई करतील का ?

सिवान (बिहार) येथे भाजपच्या प्रभाग अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने जात आहे, हेच अशा घटनांवरून लक्षात येते !

(म्हणे) ‘मंदिरात माझ्यासमवेत जातीभेद करण्यात आला !’ – के. राधाकृष्णन्, मंदिर व्यवहारमंत्री, केरळ

के. राधाकृष्णन् यांनी मंदिराचे नाव सांगितले पाहिजे. अशा प्रकारे मंत्र्यांचा कुणी जातीमुळे अवमान करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे; मात्र जातीच्या नावाखाली जर हिंदु धर्मावर जाणीवपूर्वक टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हिंदूंनी त्याचा वैध मार्गाने विरोध करणेही आवश्यक आहे !

खासदारांनी घेतला जुन्या संसदेचा निरोप !

जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनामध्ये जाण्यापूर्वी सर्व खासदारांनी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये एकत्र येऊन निरोप घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व खासदारांना संसद भवनाच्या नव्या इमारतीत घेऊन गेले.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !

‘सर्व देशवासियांना श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपति बाप्पा मोरया !’, अशा शब्दांत मराठीतून ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

तमिळनाडूमध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती बनवण्यावर बंदी कायम ! – सर्वोच्च न्यायालय

तमिळनाडू राज्यामध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती बनवण्यावर बंदी कायम असणार आहे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. मद्रास उच्च न्यायालयाने यापूर्वी यावर बंदी घातली होती. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

उज्‍जैन आणि ओंकारेश्‍वर येथे महाराष्‍ट्रातील पर्यटक अडकल्‍याची भीती !

मध्‍यप्रदेशातील दक्षिण भागात गेल्‍या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. त्‍यामुळे नर्मदा आणि क्षिप्रा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. ओंकारेश्‍वर जलाशयातील पाण्‍याचा मोठा विसर्गही नर्मदा नदीमध्‍ये सोडण्‍यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक वाघनखे सातारा येथे आणणार ! – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

वाघनखे वर्ष १८२४ मध्‍ये इंग्रजांनी लंडनला नेली. १९९ वर्षानंतर आता ही वाघनखे पुन्‍हा भारतात येणार आहेत. पुढील केवळ ३ वर्षे हा अनमोल ठेवा भारतात रहाणार आहे.

भाषेचा सन्‍मान केला, तर ती तुम्‍हाला प्रतिष्‍ठा देईल ! – आशुतोष राणा, चित्रपट अभिनेते आणि लेखक

तिसर्‍या अखिल भारतीय राजभाषा परिषदेच्‍या दुसर्‍या दिवसाच्‍या तिसर्‍या सत्रात प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले

डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हा देश सत्‍याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्‍यामुळे डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील, असे स्‍पष्‍ट मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्‍यक्‍त केले.