केवळ ‘अल्लाहू अकबर’ म्हटल्याने प्रगती होणार नसल्याने शिक्षण घेणे आवश्यक ! – देहलीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग

मदरशांमध्ये शिकणारे जिहादी आतंकवादी का बनतात ? मदरशांत विद्यार्थ्यांवर त्यांचे शिक्षक लैंगिक अत्याचार का करतात ?, यांविषयीही नजीब जंग यांनी बोलायला हवे !

जिल्हाधिकार्‍यांनी गुरूंना स्वतःच्या खुर्चीवर बसवल्याने विरोध झाल्याने मागावी लागली क्षमा !

गुरूंना जिल्हाधिकार्‍यांच्या खुर्चीवर बसल्याने कोणते आकाश कोसळणार होते ? हिंदु धर्मानुसार शासनकर्त्यांनी संतांचा सन्मान केला पाहिजे. असे असतांना अशा प्रकारचा कुणी विरोध करत असेल, तर तो हास्यास्पद म्हणायला हवा !

क्रिकेटपटू रिंकू सिंह यांनी बांधले कुलदेवीचे मंदिर !

सिंह यांच्या कुटुंबाची कुलदेवता श्री चौदेरेदेवी आहे. इंडियन क्रिकेट लीग अर्थात् ‘आय.पी.एल्.’ आणि भारतीय क्रिकेट संघात खेळतांना चांगली कामगिरी व्हावी, यासाठी त्यांनी कुलदेवीकडे आशीर्वाद मागितले होते.

Nilesh Rane : भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांची सक्रीय राजकारणाला साेडचिठ्ठी

‘एक्स’च्या माध्यमातून यासंदर्भातील पोस्ट करून दसऱ्याच्या दिवशीच त्यांनी मोठा राजकीय धक्का दिल्याचे सांगितले जात आहे.

‘वाघ बकरी चाय’ आस्थापनाच्या कार्यकारी संचालकांचे निधन 

‘वाघ बकरी चाय’चे कार्यकारी संचालक पराग देसाई (वय ४९ वर्षे) यांचे निधन झाले. गेल्या आठवड्यात कर्णावती येथे मॉर्निंग वॉकच्या वेळेला भटक्या कुत्र्यांनी त्यांवर आक्रमण केले. यात स्वतःचा बचाव करतांना ते पाय घसरून खाली पडले. डोक्याला दुखापत झाल्याने ब्रेन हॅमरेज झाले.

५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक किमतीचे एम्.डी. जप्त !

मुंबई पोलिसांनी गेल्या २ वर्षांत ५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक किमतीचे एम्.डी. (मेफेड्रोन) जप्त केले आहे. या कारवायांमध्ये नाशिक, सोलापूर, नालासोपारा, कोल्हापूर येथे एम्.डी. निर्मिती करणारा प्रत्येकी एक कारखाना आणि गुजरातमधील दोन कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

म्हादई व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्यास गोवा सरकारला मुदतवाढ नाही

गोवा सरकारने म्हादई व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्यास मागितलेली मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नाकारल्याचे वृत्त आहे.

गोव्यातून आंध्रप्रदेशला नेण्यात येणारे मद्य बेळगाव येथे कह्यात

हे मद्य गोव्याच्या सीमेवरून विनातपास बेळगावला पोचले कि लाच घेऊन ते सोडण्यात आले ? हल्ली काही दिवसांत अशा अनेक घटना घडल्या आहेत. सरकार याचे अन्वेषण करून दोषींवर कारवाई करणार का ?

येत्या दिवाळीला श्रीकृष्ण  उत्सव साजरा करा !

येत्या दिवाळीला नरकासुरांचा उदो उदो करू नका, त्यापेक्षा श्रीकृष्ण उत्सव साजरा करा. आपल्या संस्कृतीचे जतन करा, असे आवाहन वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी केले.

दसर्‍याच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शुभेच्छा !

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी गोमंतकियांना दसर्‍याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.