पणजी – गोवा सरकारने म्हादई व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्यास मागितलेली मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नाकारल्याचे वृत्त आहे. यामुळे गोवा सरकारसमोरील अडचणीत वाढ होणार आहे. गोवा खंडपिठाने म्हादई व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्यास दिलेली समयमर्यादा २४ ऑक्टोबरला संपुष्टात येत आहे. गोवा सरकारने गोवा खंडपिठाच्या या निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वाेच्च न्यायालयात १० नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होणार असल्याने गोवा खंडपिठाने मुदतवाढ १० नोव्हेंबरपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी गोवा सरकारने गोवा खंडपिठाकडे केली होती.