देहलीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग यांचा मुसलमानांना घरचा अहेर !
(‘अल्लाहू अकबर’ म्हणजे अल्ला महान आहे)
बाराबंकी (उत्तरप्रदेश) – केवळ ‘अल्लाहू अकबर’ म्हटल्याने प्रगती होणार नाही. शिक्षण अधिक आवश्यक आहे. ज्या धर्माचा प्रारंभ ‘इक्र’ (शिक्षित) या शब्दापासून होतो, त्याच धर्माचे लोक आज सर्वांत मागे आहेत. आज मुसलमान मुलांना धार्मिक शिक्षणासह जगात देण्यात येणारे शिक्षणही आवश्यक आहे. उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश राज्यांत दलित मुसलमान सर्वाधिक मागास आहेत, असा घरचा अहेर देहलीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग यांनी येथे मुसलमानांना दिला. ते येथे रफी अहमद किडवई मेमोरियल डिग्री कॉलेजच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
नजीब जंग पुढे म्हणाले की, लोकांना गैरसमज आहे की, मदरशांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा अल्प असते; मात्र वास्तव असे नाही. मदरशांमध्ये ८ वी इयत्तेपर्यंत शिकलेले विद्यार्थी जेव्हा पुढचे शिक्षण घेतात, तेव्हा त्यांच्यातील प्रतिभा दिसून येते, असा दावाही त्यांनी केला. (मदरशांमध्ये शिकणारे जिहादी आतंकवादी का बनतात ? मदरशांत विद्यार्थ्यांवर त्यांचे शिक्षक लैंगिक अत्याचार का करतात ?, यांविषयीही नजीब जंग यांनी बोलायला हवे ! – संपादक)