१ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात हरिद्वार कुंभमेळा होणार ! – उत्तराखंड सरकारचा निर्णय

नवीन रेल्वे किंवा बस यांना अनुमती नाही !

लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर कर्नाटकच्या जलसंपदामंत्र्यांकडून त्यागपत्र

सर्वपक्षांचे नेते एकाच माळेचे मणी आहेत, अशांची निष्पक्षपणे चौकशी होईल का ?

कर्नाटकच्या भाजप सरकारच्या कृषीमंत्र्यांनी घरातच सपत्नीक घेतली कोरोनाची लस !

टीका झाल्यानंतरही केले चुकीचे समर्थन ! सरकारी नियमांचे उल्लंघन करणार्‍या अशा मंत्र्यांवर भाजपने कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !  

‘अ‍ॅमेझॉन प्राईम’कडून विनाअट क्षमायाचना !

हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम ! अ‍ॅमेझॉन प्राईम आणि अन्य ओटीटी मंचांकडून सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या वेब सिरीज प्रसारित झाल्या असल्याने केवळ क्षमायाचना मागितल्याने त्यांना सोडून देण्यात येऊ नये. अशांना शिक्षा होण्यासाठीच प्रयत्न झाले पाहिजेत, तेव्हाच त्यांच्यावर वचक बसेल !

सरकारपेक्षा वेगळे मत व्यक्त करणे म्हणजे देशद्रोह नाही ! – सर्वोच्च न्यायालय

फारूख अब्दुल्ला यांच्या विरोधात याचिका करणार्‍याला ५० सहस्र रुपयांचा दंड !

कोरोना प्रतिबंधक लस बनवणार्‍या भारतीय आस्थापनांवरही चीनचे सायबर आक्रमण ! – सिंगापूरच्या सायबर गुप्तचर आस्थापनाचा दावा

या दाव्यात तथ्य असेल, तर प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने नमते घेतल्याचे दाखवले असले, तरी त्याने वेगळ्या प्रकारे भारतावर आघात करण्याचे षड्यंत्र रचले आहे, हेच खरे !

काश्मिरी नेते सुशील पंडित यांच्या हत्येसाठी आलेल्या दोघा गुंडांना देहली पोलिसांकडून अटक

हिंदुत्वनिष्ठ नेत्याच्या हत्येसाठी जिहाद्यांशी हातमिळवणी करणार्‍या राष्ट्रघातक्यांना कठोर शिक्षा करा !

मंदिर सरकारीकरणाचा निर्णय प्रशासनाने त्वरित मागे घ्यावा ! – गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

एकीकडे शासन ‘सेक्युलर’ आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण करायचे, असे करत आहे. या निर्णयास सर्व देवस्थान समित्यांचे विश्‍वस्त, भाविक, हिंदुत्वनिष्ठ यांचा तीव्र विरोध असून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा.

मथुरा येथील कथावाचक सुमेधा नंदजी महाराज यांना हिंदी भाषेतील सनातन पंचांग भेट

राधा नगरातील श्री राधेश्‍वर महादेव मंदिराच्या वार्षिक महोत्सवाच्या वेळी संत समागमास उपस्थित राहिलेले वृंदावन येथील कथावाचक श्री सुमेधा नंदजी महाराज यांची सनातनचे साधक श्री. राजीव भाटिया आणि साधिका विमल धमीजा यांनी भेट घेतली.

लिव-इन रिलेशनशिपमध्ये सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यावर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

पुरुष किंवा महिला विवाहाचे आश्‍वासन पाळत नसेल, तेव्हा बलात्काराचा होणारा आरोप मान्य करता येणार नाही.