छद्मविज्ञानाच्या विरोधात अंनिसकडून ऑनलाईन व्याख्यानमाला

  • अंधश्रद्धेच्या बुरख्याआडून सातत्याने आणि जाणीवपूर्वक हिंदु देवता, धर्म, सण यांना विरोध करणारी अंनिस या माध्यमातूनही हिंदुद्वेषाचा कंड शमवून घेईल, यात शंका नाही !
  • कोरोनाच्या महाभयंकर संकटात हिंदु धर्मशास्त्रातील सूत्रे समाजासाठी वरदान ठरत असतांना त्याविषयी बुद्धीभेद करणे, हा आत्मघातच होय ! हा अंनिसचा विवेक आहे का ?
  • धर्माभिमानी हिंदूंनी सामाजिक माध्यमांतून अंनिसचा दांभिकपणा उघड करायला हवा !

सातारा, १० मे (वार्ता.) – विज्ञानाच्या नावाखाली समाजात आशास्त्रीय प्रकार होत असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केला आहे. यावर ११ ते १४ मे या कालावधीत ‘ऑनलाईन’ व्याख्यानमाला ठेवण्यात आली आहे. फसव्या विज्ञानाला (स्यूडो सायन्स) यातून विरोध करण्यात येणार आहे. छद्मविज्ञानावर यात बोलले जाणार आहे.