रिकाम्या आणि भरलेल्या ऑक्सिजन सिलिंडरचे मूल्य ठरवा ! – देहली उच्च न्यायालयाचे देहली सरकारला निर्देश

नवी देहली – रिकामे अथवा भरलेले ऑक्सिजन सिलिंडर यांचे मूल्य ठरवले गेले पाहिजे. एकाच मूल्यात सर्वांना ऑक्सिजन सिलिंडर मिळाले पाहिजेत, असे निर्देश देहली उच्च न्यायालयाने देहली सरकारला दिले आहेत. (हेही न्यायालयाला सांगावे लागते, हे आप सरकारसाठी लज्जास्पद ! – संपादक)