भारताने अल्प केली शस्त्रास्त्रांची आयात !

‘मेक इन इंडिया’च्या पुढाकारानंतर भारताने शस्त्रास्त्रांची आयात अल्प करण्यावर भर दिला आहे.

भाजपचे खासदार शर्मा यांची देहलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राम स्वरूप शर्मा हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते.

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमधील न्यायाधिशांकरता संमत झालेल्या १ सहस्र ८० जागांपैकी ४१९ पदे रिक्त !

भारतीय न्यायालयांमध्ये न्यायाधिशांच्या कमतरतेची समस्या गंभीर झाली आहे.

देशात साडेतीन कोटी लसींच्या डोसचा वापर, तर परदेशांना ५ कोटी ८४ लाख डोसची निर्यात  !

‘देशात लसीचा भरपूर साठा असून येथील लोकांची गरज भागवून इतर देशांना लस निर्यात केली जात आहे’ – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्‍विनीकुमार चौबे

स्वयंसेवी संस्था चालवणार्‍या महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, त्या कसले संस्कार करणार ? – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! ती शिकवली असती, तर जनतेमध्ये नैतिकता निर्माण होऊन सुसंस्कृत समाज निर्माण झाला असता !

विमा क्षेत्रात ७४ टक्के थेट परकीय गुंतवणुकीला राज्यसभेत संमती !

अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी म्हटले की, सरकारने विमा क्षेत्रातून येणारा पैसा हा देशातच गुंतवला जाईल, याची कायद्यात तरतूद केली आहे. ‘येथे या पैसा कमवा आणि पळून जा’ असे आम्ही म्हणत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलक प्रदर्शनामुळे लाखो भाविकांपर्यंत धर्मरक्षणाचा विषय पोचेल ! – पू. आशिष गौतम

समितीचे धर्मशिक्षण, राष्ट्र आणि धर्म रक्षण यांविषयीचे कार्य ऐकून पू. आशिष गौतम यांनी कुंभपर्वात त्यांच्या आश्रमामध्ये होणार्‍या कार्यक्रमात समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली.

फरीदाबाद आणि मथुरा येथील ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबाद येथे सेक्टर २८ मधील शिवशक्ती मंदिर आणि ग्रेटर फरीदाबाद येथील एस्.आर्.एस्. रेसिडेन्सी सेक्टर ८८ मधील शिवमंदिर या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना आमचे सदैव सहकार्य राहील ! – प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी

प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक आहेत. या आश्रमामध्ये वेदपाठशाळा, यज्ञशाळा आणि अन्नछत्र चालवले जाते.

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

देशात पुरो(अधो)गाम्यांच्या हत्या झाल्यावर देशातील सर्वच राजकीय पक्ष आवाज उठवतात; मात्र हिंदुत्वनिष्ठांच्या किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यावर कुणीही बोलत नाहीत, हा त्यांचा ढोंगीपणाच होय !