लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील नाल्यांच्या पाण्यात सापडले कोरोनाचे विषाणू !

प्रतिकात्मक छायाचित्र

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – कोरोनाचा संसर्ग हवेच्या माध्यमातून होत असल्याचे समोर येत असतांना आता त्याचे विषाणू पाण्यामध्येही सापडले आहेत. येथील नाल्याच्या पाण्यामध्ये कोरोनाचे विषाणू सापडले आहेत. लक्ष्मणपुरी येथे ३ ठिकाणच्या नाल्याचे नमुने संशोधनासाठी घेण्यात आले होते. यांतील रूकपूर खदरा या भागातील नाल्याच्या पाण्यात कोरोनाचे विषाणू सापडले आहेत. सध्या हे प्राथमिक संशोधन असल्याचे सांगण्यात आले आहे. यातून संसर्ग होणार कि नाही, याचे संशोधन करणे शेष आहे. तसेच नद्यांमध्ये प्रवाहित करण्यात आलेल्या कोरोनाबाधितांच्या मृतदेहांच्या माध्यमांतून तेथील पाण्यात कोरोनाचे विषाणू आहेत कि नाही, याचा अद्याप अभ्यास करण्यात आलेला नाही.