आझमगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील ३०० मदरशांमध्ये घोटाळा !

राज्य सरकारचे अनुदानापोटी कोट्यवधी रुपये लाटले !  

  • देशात अन्यत्रही अशा प्रकारचा घोटाळा होत असल्यास केंद्र आणि राज्य सरकारांनी याची चौकशी केली पाहिजे ! प्रशासनाकडून मदरशांची योग्य माहिती आणि तिची पडताळणी अनुदान देण्यापूर्वी का केली गेली नाही ? कि या घोटाळ्यामध्ये प्रशासकीय अधिकारीही सहभागी आहेत ? यांचाही शोध घेतला पाहिजे !
  • अनुदान मिळवण्यासाठी खोटी माहिती देणार्‍या संबंधितांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा केली पाहिजे !
  • अशा घटनांविषयी निधर्मीवादी तोंड उघडतील का ?

आझमगड (उत्तरप्रदेश) – आझमगड जिल्ह्यातील ६८३ मदरशांमधील जवळपास ३०० मदरशांमध्ये घोटाळा होत असल्याचे समोर आले आहे. येथे शिक्षक आणि कर्मचारी यांच्या नियुक्तीविषयी खोटी माहिती देण्यात आल्याचा आरोप आहे. यांतील १०० मदरशांना सरकारकडून अनुदान मिळत आहे. सरकारने केलेल्या चौकशीमध्ये हे समोर आले आहे. त्यातही काही मदरसे केवळ कागदावर असून प्रत्यक्षात तेे अस्तित्वात नाहीत. अशा प्रकारे सरकारची कोट्यवधी रुपयांची लूटमार केली जात होती.

वर्ष २०१७ मध्ये सरकारकडून राज्यातील सर्व मदरशांची माहिती ऑनलाईन जमा करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. यात या जिल्ह्यातील वरील सर्व मदरशांनी माहिती भरलेली होती. त्यांची चौकशी केली असता हा घोटाळा उघड झाला. आता सरकार विशेष चौकशी पथकाद्वारे घोटाळ्याची चौकशी करणार आहे.