गुंड आणि आमदार मुख्तार अंसारी याला पोलिसांच्या कह्यात द्या ! – सर्वोच्च न्यायालय

उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड असणारा आमदार मुख्तार अंसारी याला उत्तरप्रदेशच्या कारागृहामध्ये २ आठवड्यांत स्थानांतरित करण्यात यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला दिला आहे.

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना वर्ष २०२० चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. २५ मार्च या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली.

चीनची शैक्षणिक क्षेत्रांमध्ये वाढती घुसखोरी

भारतात रहाणारे चिनी शिकवण्याचे काम अल्प करतात आणि भारतीय तरुणांचा बुद्धीभेद करून मानसिक युद्ध करण्याचा प्रयत्न अधिक करतात. अशा गोष्टींचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होत असतो. आशा आहे की, येणार्‍या काळात भारत सरकार हेही थांबवण्याचा प्रयत्न करेल.

तहसीलदाराने भ्रष्ट कमाई लपवण्यासाठी जाळल्या १५ ते २० लाखांच्या नोटा !

एका तहसीलदाराकडे लाखो रुपयांच्या नोटा मिळतात, यावरून प्रशासन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने बरबटल्याचे स्पष्ट होते. प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड नष्ट करण्यासाठी अशा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक !

चिनी सैनिक पँगाँगमधून हटले, तरी प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील धोका टळलेला नाही ! – सैन्यदलप्रमुख नरवणे

चीनसमवेतच्या करारानंतर चिनी सैनिक पँगाँग सरोवराच्या भागातून मागे हटल्याने भारताला असलेला धोका अल्प झाला असला, तरी पूर्णतः संपलेला नाही, असे सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी स्पष्ट केले.

‘औषधी वनस्पतींच्या लागवडीचे प्रशिक्षण’ या उपक्रमाला प्रसिद्धी दिल्याविषयी जनशिक्षण संस्थानकडून दैनिक ‘सनातन प्रभात’चे आभार !

जनशिक्षण संस्थानने त्यांच्या ‘फेसबूक’ पानावर आयुर्वेद आणि वनौषधी यांचे महत्त्व ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त प्रसिद्ध केले व आभार व्यक्त केले आहेत.

सेन्सेक्समध्ये चौथ्या दिवशी ७४०.१९ अंकांची घसरण

सातत्याने होणार्‍या घसरणीविषयीची कारणे सांगतांना तज्ञांनी देशभरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, हे एक प्रमुख कारण सांगितले आहे.

मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हातात दिले पाहिजे !

भारतातील प्रसिद्ध हिंदु खेळाडू, अभिनेते कधीही हिंदु धर्माविषयी बोलत नाहीत; कारण असे बोलले, तर त्यांच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेला धक्का बसेल, असे त्यांना वाटत असते; मात्र येथे वीरेंद्र सेहवाग यांनी मंदिरांच्या सरकारीकरणाचा विरोध केल्यामुळे त्यांचे कौतुकच करायला हवे !

मशिदींवरील भोंग्यांमुळे त्रास होत असल्याने न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यास सांगा ! – उत्तरप्रदेशच्या मंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

यापूर्वीच अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरूंनीही अशा प्रकारची तक्रार केली होती. राज्यातील जनतेला मशिदींवरील भोंग्यांमुळे त्रास होत असतांना प्रशासन आणि पोलीस बहिरे झाले आहेत का ?

कुंभमेळा भारताची सांस्कृतिक महानता दर्शवतो ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले की, विशिष्ट तिथी, ग्रहस्थिती आणि नक्षत्र यांच्या योगावर आलेल्या कुंभपर्वाच्या वेळी ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा प्रभाव प्रयाग, हरिद्वार, उज्जैन अन् नाशिक येथील गंगा नदीसह अन्य नद्यांमध्ये दिसून आला आहे.