अरबी समुद्रातील ३ नौकांतून अमली पदार्थांसह मोठा शस्त्रसाठा कह्यात; ३ नौकांसह १९ मासेमारांना अटक

तटरक्षक दलाने अरबी समुद्रातील ३ संशयित नौकांवर केलेल्या कारवाईत ४ सहस्र ९०० कोटी रुपयांचा १ सहस्र ६०० किलो अमली पदार्थांचा साठा, तसेच एके ४७ च्या ५ रायफली आणि १ सहस्र जिवंत काडतुसे कह्यात घेतली.

गुजरात बॉम्बस्फोटामधील आरोपीला पुणे येथून १५ वर्षांनंतर अटक !

अहमदाबाद जिल्ह्यातील कालुपूर रेल्वे स्थानक येथे वर्ष २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पुणे पोलिसांच्या साहाय्याने गुजरात आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) मोहसीन पूनावाला याला वानवडी परिसरातून २३ मार्च या दिवशी अटक केली.

भारत ‘कोविशील्ड’ची निर्यात न करता देशांतर्गत लसीकरणावर अधिक लक्ष देणार !

भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने आता भारत सरकारने ‘स्ट्राझेनेका’ची लस इतर देशांना निर्यात न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने देशांतर्गत लसीकरणावर अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषी कायद्यांना विरोध करणार्‍या शेतकर्‍यांचे आज भारत बंद आंदोलन

गेल्या ४ मासांपासून देहलीच्या सीमेवर केंद्रीय कृषी कायद्यांचा विरोध करणार्‍या शेतकर्‍यांनी उद्या २६ मार्च या दिवशी भारत बंदचे आयोजन केले आहे. त्यांच्या आंदोलनाला १२० दिवस झाल्याच्या निमित्ताने हा बंद आयोजित करण्यात आला आहे.

रस्त्यावरील नमाजपठण आणि मशिदींतील भोग्यांवरून होणारी अजान बंद करण्याची मागणी !

केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना त्यांनी अशा प्रकारची बंदी घातलेली नाही. त्यांनीही अशी बंदी घालावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

(म्हणे) ‘भारतातील ३० टक्के मुसलमान संघटित झाले, ४ नवीन पाकिस्तान बनतील !’

केंद्र सरकारने तात्काळ केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमांतून शेख आलम यांच्यावर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबावे, असेच हिंदूंना वाटते ! आलम यांच्या या विचारांच्या मागे कोणते षड्यंत्र आहे का, याचाही शोध घ्यावा.

विश्‍व हिंदु परिषद देशातील ४ लाख मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात अभियान राबवणार !

विहिंपचे हे स्तुत्य अभियान आहे. असे असले, तरी केंद्र सरकारने आणि भाजप शासित राज्यांनीच मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी कायदा केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

‘जे आरोप तुम्ही केले आहेत ते गंभीर आहेत यात शंका नाही; मात्र हे प्रकरण एवढे गंभीर होते, तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाहीत ?’ – सर्वोच्च न्यायालय

कुंभमेळ्याला येणार्‍या भाविकांना कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करावाच लागणार !

कुंभमेळ्यासाठी येणार्‍या भाविकांना कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

अयोध्येत श्रीराममंदिराचा पाया खोदतांना सापडल्या मूर्ती आणि चरणपादुका !

सध्या श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिर उभारण्यासाठी भूमीचे सपाटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोदकाम करतांना प्राचीन ‘सीतामाता की रसोई’ मंदिर स्थळी चरणपादुका, चौकट आणि खंडित देवमूर्तींचे अवशेष आढळून आले.