सी.बी.एस्.ई. आणि सी.आय.एस्.सी.ई. यांच्याकडून १२ वीची परीक्षा रहित

नवी देहली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, म्हणजेच सी.बी.एस्.ई.च्या इयत्ता १२ वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.   सी.आय.एस्.सी.ई.नेही १२ वीची परीक्षा रहित करण्याची घोषणा केली. इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे ? याविषयी स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील, असे सी.बी.एस्.ई.कडून सांगण्यात आले. देशातील महाराष्ट्र, देहली, गोवा, अंदमान-निकोबार राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी परीक्षा घेऊ नये, अशी भूमिका मांडली होती, तर अन्य राज्यांनी परीक्षा घ्यावी, असे सांगितले होते.

इयत्ता १२ वीची परीक्षा रहित केल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांना पर्यायी पद्धतीने दिलेला निकाल मान्य नसेल किंवा परीक्षा देण्याची इच्छा असेल, त्यांना कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यानंतर परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.