राजस्थानमध्ये कोरोनाच्या लसींचे ११ लाख ५० सहस्र डोस वाया !  – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा दावा

सरकारी आकडेवारीनुसार केवळ २ टक्के डोस वाया !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने खरी आकडेवारी समोर येईल, याची शक्यता नाही, असेच म्हणावे लागेल !

जयपूर (राजस्थान) – केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राजस्थानमध्ये कोरोना लसींचे ११ लाख ५० सहस्र डोस वाया गेल्याचा दावा केला आहे. लसीच्या एका वायलमध्ये (कूपीमध्ये) १० डोस असतात. या १० मध्ये काही व्यक्ती लसीकरणासाठी उपलब्ध झाल्या नाहीत, तर उर्वरित लसी टाकून द्याव्या लागतात. यामुळे देशात आतापर्यंत मोठ्या संख्येने लसी वाया गेल्या आहेत.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार राजस्थानमधील ८ जिल्ह्यांमधील ३५ लसीकरण केंद्रांवर ५०० वायलमधील २ सहस्र ५०० डोस कचरापेटीत सापडले आहेत. दुसरीकडे सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात केवळ २ टक्के डोसच वाया गेले आहेत.