कोरोनाची लाट हा आपत्काळ आहे आणि त्याहून अधिक तीव्र आपत्काळ पुढे येणार आहे, असे संत सांगत आहेत, हे पहाता साधना करण्याला आणि देवाला शरण जाण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !
नवी देहली – कोरोना महामारीमुळे मे मासामध्ये सुमारे दीड कोटी भारतियांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सी.एम्.आय.ई.च्या) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
https://t.co/TQt9ijASBc#COVID19 #unemploymentrate #IndianEconomy
— CMIE (@_CMIE) June 1, 2021
या अहवालानुसार एप्रिल मासामध्ये ३९ कोटी ७० लाख लोकांकडे रोजगार होते; मात्र मे मासामध्ये या संख्येत घट होऊन ती ३७ कोटी ५० लाखवर आली आहे. बेरोजगारीचा दर मे मासामध्ये १२ टक्के होता, तर एप्रिलमध्ये ८ टक्के होता. एप्रिल आणि मे मासांमध्ये कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव असतांना नोकर्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कपात चालू होती. आकडेवारीनुसार कोट्यवधी बेरोजगारांपैकी ७ कोटी ७ लाख जण रोजगाराच्या शोधात होते; परंतु संधी अल्प असल्याने त्यांना नोकरी मिळाली नाही.