पंतप्रधान सर्व प्रश्‍न सकारात्मकतेने सोडवतील, अशी अपेक्षा आहे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील विविध विषय मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती !

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पंतप्रधानांची भेट घेणार !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहली येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ८ जून या दिवशी सकाळी ११ वाजता ही भेट होणार आहे

२१ जूनपासून केंद्र सरकार देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे विनामूल्य लसीकरण करणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

खासगी रुग्णालयांतही लस मिळणार आहे. तेथे केवळ लसीच्या मूल्यापेक्षा केवळ दीडशे रुपये अधिक रक्कम घेऊन ही उपलब्ध असणार आहे, असेही मोदी यांनी घोषित केले.

जामा मशिदीच्या दुरुस्तीसाठी शाही इमाम यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

हिंदूंच्या प्राचीन मंदिरांच्या दुरुस्तीसाठी किती धर्माचार्य पंतप्रधानांना पत्र लिहितात ? मुळात सरकारनेच हिंदूंच्या प्राचीन मंदिरांच्या दुरुस्तीसाठी स्वतःहून प्रयत्न करणेही अपेक्षित आहे !

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान मोदींनी काम करावे ! – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

राज्यशासनाच्या शिवस्वराज्य उपक्रमाचा प्रारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते नगर जिल्हा परिषदेत झाला त्यावेळी ते बोलत होते.

महागाई वाढली असे वाटत असेल, तर खाणे, पिणे आदी सोडावे !

ज्या लोकांना महागाई राष्ट्रीय आपत्काळ वाटत आहे, त्यांनी खाणे, पिणे आदी सोडले पाहिजे. पेट्रोल, डिझेल यांचा वापर करणे सोडले पाहिजे. काँग्रेसला मत देणारे जर असे करतील, तर महागाई न्यून होईल, असे प्रत्युत्तर भाजपचे नेते  आणि माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी काँग्रेसच्या टीकेवर दिले आहे.

पेटा संस्थेवर भारतात बंदी घाला ! – अमूल आस्थापनाची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्र लिहून मागणी

पेटा सारख्या संस्था भारतविरोधी कारवाया करत असतील, तर त्यांच्यावर सरकारने स्वतःहून बंदी घातली पाहिजे ! पेटासारख्या प्राणीरक्षक संस्था बकरी ईदच्या दिवशी गायब असतात, हे जगजाहीर आहे !

देशाला महासत्ता बनवण्यासाठीचे पंतप्रधान मोदी यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे ! – नारायण राणे, खासदार, भाजप

‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत’, हे सांगतांना अभिमान वाटतो.

लोकांची सामूहिक शक्ती आणि सेवाभाव यांमुळे देश प्रत्येक वादळातून बाहेर पडला !  – पंतप्रधान मोदी

कोरोना संसर्गामुळे ज्यांनी त्यांच्या जीवलगांना गमावले आहे, त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करतो. आपण सर्व या कठीण परिस्थितीत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. आपण या महामारीचा फटका सहन केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकार्‍यांशी साधला ‘ऑनलाईन’ संवाद !

नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थानिक पातळीवर राबवलेल्या उपक्रमांविषयी पंतप्रधानांकडून समाधान