छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान मोदींनी काम करावे ! – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

नगर – छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान मोदींनी काम करावे अशी अपेक्षा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. राज्यशासनाच्या शिवस्वराज्य उपक्रमाचा प्रारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते नगर जिल्हा परिषदेत झाला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले पुढे म्हणाले की, लसीकरणावरून देशात चालू असलेला गोंधळ योग्य नाही. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने जूनमध्ये १० कोटी डोस उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते; परंतु केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला धमकी दिली. त्यामुळे हे डोस मिळू शकलेले नाहीत.