जामा मशिदीच्या दुरुस्तीसाठी शाही इमाम यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

हिंदूंच्या प्राचीन मंदिरांच्या दुरुस्तीसाठी किती धर्माचार्य पंतप्रधानांना पत्र लिहितात ? मुळात सरकारनेच हिंदूंच्या प्राचीन मंदिरांच्या दुरुस्तीसाठी स्वतःहून प्रयत्न करणेही अपेक्षित आहे !

नवी देहली – येथील जामा मशिदीच्या एका मिनारची वादळामुळे पडझड झाल्यामुळे मशिदीचे शाही इमाम बुखारी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून त्याची दुरुस्ती करावी, अशी विनंती केली आहे. ही मशीद १७ व्या शतकात बांधलेली आहे. जामा मशिदीची देखभाल करण्याचे दायित्व देहली वक्फ बोर्डाकडे आहे.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, गेल्या ५० वर्षांपासून मिनारांच्या दुरुस्तीसाठी कोणतेही काम करण्यात आलेले नाही. मशिदीची आता भारतीय पुरातत्व विभागाने पहाणी करणे आवश्यक आहे. मशिदीचे अनेक दगड जीर्ण झाले असून त्यांतील अनेक दगड खालीही पडतात. आताही मिनारवरून काही दगड पडले; परंतु दळणवळण बंदीमुळे मशीद बंद असल्याने मोठा अपघात टळला.