पंजाबमध्ये संघाच्या स्वयंसेवकाची हत्या करणार्‍या खलिस्तानवाद्यांना ब्रिटनमध्ये अटक आणि जामिनावर सुटका

भारतात कुणीही येऊन भारतीय नागरिकाची हत्या करून पुन्हा पसार होतो, हे भारताला लज्जास्पद !

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बोठे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी

रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही, त्यामुळे पोलिसांनी आता त्यांच्याशी संबंधित आणि कार्यालयीन सहकार्‍यांकडेही चौकशी चालू केली आहे.

बंगालमधील मुसलमानबहुल भागात हिंदूंना मतदान करण्यापासून रोखले जाते ! – सर्वोच्च न्यायालयात याचिका

केवळ बंगालमध्येच नव्हे, तर अन्य राज्यांतील मुसलमानबहुल भागात असे होते का ? याची माहिती आता निवडणूक आयोगाने आणि तेथील सरकारने घेतली पाहिजे आणि जर असे होत असेल, तर तेथे हिंदूंना संरक्षण देत त्यांना मतदान करू दिले पाहिजे !

पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना जन्मठेपेची शिक्षा

राज्यातील सिस्टर अभया हत्येच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

पाद्रयांच्या वासनांधतेचा बळी !

देशात चर्च संस्थेला हिंदूंची मंदिरे आणि मुसलमानांच्या मशिदी यांच्या तुलनेत अधिक सुसंस्कृत, सभ्य आणि प्रेमाचे अन् शांततेचे पाईक समजले जात होते. हे किती तकलादू आणि ढोंगी आहे, हे सिस्टर अभया या घटनेतून उघड झाले . चर्च संस्थेचे खरे स्वरूप भारतियांच्या आता लक्षात येऊन ते त्यांच्याविषयी ताकही फुंकून पितील, अशी अपेक्षा.

पाकिस्तानी सैन्याच्या बलुची नागरिकांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठवणार्‍या करिमा बलुच यांचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

बलुचिस्तानसाठी लढणार्‍या व्यक्तीचा अशा प्रकारे संशयास्पदरित्या मृत्यू होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. पत्रकार साजिद हुसैन यांचा ही असाच मृत्यू झाला होता !

भारताने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात साहाय्य करावे ! – बलुची संघटनांचे आवाहन

बलोच नॅशनल मूव्हमेंटच्या ब्रिटनमधील शाखेने आणि तिच्याशी संबंधित संघटनांनी पाकमध्ये बलुच लोकांवरील अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्याची भारत सरकारकडे मागणी केली आहे. या संघटनांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात साहाय्य करण्याचेही आवाहन केले आहे.

एम्आयएम्चे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांच्या मुलासह दोघांना अटक

कराड,भाजी मंडई परिसरात १५ डिसेंबरच्या रात्री जुबेर आंबेकरी या युवकाचा धारदार शस्त्राने आणि डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला होता.

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या

राज्यातील उत्तर २४ परगणाच्या हलि शहरामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणात भाजपच्या सैकत भवाल या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर अन्य ६ जण घायाळ झाले, अशी माहिती भाजपने ट्वीट करून दिली आहे.