महंमद कलीम याने हिंदु मुलावर प्रेम करणार्‍या स्वतःच्या १६ वर्षीय बहिणीची गळा चिरून केली हत्या

मुसलमानांचा कट्टरवाद !

मध्यभागी आरोपी महंमद कलीम

गोंडा (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील गोंडा येथील महंमद कलीम नावाच्या धर्मांध मुसलमानाने अरुण नावाच्या एका हिंदु मुलावर प्रेम करणार्‍या स्वतःच्या १६ वर्षांच्या बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले आहे.

याविषयीच्या एका वृत्तानुसार, तस्लिमा नावाची एक महिला तिची १६ वर्षांची मुलगी आणि २२ वर्षांचा मोठा मुलगा महंमद कलीम यांच्यासमवेत गोंडामधील एका घरात रहात होती. २ नोव्हेंबरला संध्याकाळी तस्लिमा घरी परतल्या, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला. बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर दार उघडल्यामुळे त्यांनी घरात असलेल्या त्यांच्या मुलीची विचारपूस केली. त्याच वेळी त्यांना गावातील मुलगा अरुण हा त्यांच्या मुलीसमवेत घरात दिसला. तस्लिमा यांना पहाताच तो पळून गेला. यानंतर तस्लिमा यांनी दूरभाषवरून महंमद कलीम याला घटनेची माहिती दिली. काही वेळाने कलीम घरी पोचला आणि बहिणीशी वाद घालू लागला. या वेळी त्याच्या बहिणीने त्याला सडेतोड उत्तरे दिली. याचा राग आल्याने कलीमने धारदार शस्त्राने तिच्या मानेवर वार केले. त्यामुळे तिचे शिर  शरीरापासून वेगळे झाले.

या घटनेनंतर मृताची आई तस्लिमा यांनी कटरा बाजार पोलीस ठाण्यात स्वतःच्या मुलाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह कह्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी कारवाई करत आरोपी महंमद कलीम याला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

लव्ह जिहादच्या प्रकरणांत हिंदूंना ‘प्रेमाला धर्म नसतो’ असे उपदेशाचे डोस पाजणारे आता या प्रकरणात गप्प का ?