हिंदु तरुणीच्या घरात घुसलेल्या मुसलमान तरुणाचा मारहाणीत मृत्यू

  • सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील इस्लामनगरमधील घटना

  • तरुणाच्या मृत्यूनंतर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथील इस्लामनगरमध्ये जियाउर्रहमान हा तरुण रात्रीच्या वेळी एका हिंदु तरुणीच्या घरात घुसल्यावर घरातील लोकांनी त्याला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. ‘जिहाउर्रहमान या तरुणीवर प्रेम करत होता’, असे सांगण्यात येत आहे. तो मारहाणीत घायाळ झाल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी त्याला रुग्णालयात भरती केले असता उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्याची प्रेयसी असणार्‍या सदर हिंदु तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे तरुण आणि तरुणी एकाच शिकवणी वर्गात जात होते.

पोलिसांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी कोणतीही तक्रार प्रविष्ट करण्यात आलेली नाही. तक्रार आली, तर गुन्हा नोंदवून कारवाई केली जाईल.